स्लीप ॲप्निया
झोपेतील श्वसन अवरोध / Obstructive Sleep Apnea (OSA)
मूळ लेखन: मधुमित्र मासिक — दिवाळी विशेषांक, ऑक्टोबर–नोव्हेंबर २०२४
“ रात्रभर घोरत राहूनही तू दिवसभर सुस्त आणि आळशी असतोस. तुझ्या घोरण्याने इतरांच्या झोप खराब होते आणि तरीही तुला कितीही झोप काढली तरीही पुरत नाही. आज मात्र तू हद्द केलीस. आज माझ्या भजनीमंडळातील बायकांचे भजन सुरु झाले नाही कि लगेच डुलक्या काढणे सुरु केलेस, उद्या ऑफिसच्या मीटिंग मध्ये झोपा काढशील. तुमचे तासंतास कॅम्पुटर समोर बसणे, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी बाईक वापरणे , तुमचे पिझ्झा, बर्गर मी एकवेळ खपवून घेईल पण या वयातील असा सुस्तपणा बरा नव्हे .”
“अगं आई , मी हे सारे काही मुद्दाम करतो असे नाही, मला झोपच आवरत नाही त्याला मी तरी काय करू? झोपेत घोरणे हे काय माझ्या हातात आहे का?”
काकू त्यांच्या मुलाला रागवत होत्या पण स्वतःच्या घोरण्याने आणि सुस्तपणामुळे रोहनही हवालदिल झाला होता. त्याच्या अलीकडील काळातील खाण्यापिण्याच्या सवयींमुळे त्याचे पोट सुटले होते आणि प्रचंड थकवा येत होता. स्वतःच्या तब्येतीकडे तो दुर्लक्ष करत होता आणि हेच काकूंच्या चिडण्याचे कारण होते. काही तपासण्यांनंतर रोहनला Obstructive sleep apnoea म्हणजे झोपेतील श्वसन अवरोधाचा त्रास आहे असे निदान झाले.
झोपेशी निगडित अनेक आजारांपैकी झोपेदरम्यानचा श्वसन अवरोध (obstructive sleep apnoea) हा एक प्रमुख आजार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. व्यायामाचा अभाव, बैठे काम, वाढलेला पोटाचा घेर,fast food चे अतिसेवन यामुळे हा आजार बळावतो. जीवनशैलीशी निगडित इतर आजार डायबीटीस, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये याचे प्रमाण जास्त आढळून येते.
अतिरिक्त प्रमाणात घोरणे, असमाधानकारक झोप, दिवसभर असणारा थकवा व दिवसा येणारी अवाजवी झोप (excessive daytime sleepiness) हि या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
सामान्य व्यक्तींमध्ये झोपेदरम्यान श्वसन नलिका आणि घशाचे स्नायू सैलावतात, परंतु त्यामुळे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत . OSA चा आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये मात्र या स्नायू शिथिलतेमुळे श्वसन मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो आणि प्रत्येक श्वासागणिक आवाजाची निर्मिती होते. यालाच आपण घोरणे असे म्हणतो. अशा व्यक्तींमध्ये श्वसन अवरोध झाल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. मुख्यत्वे मेंदूला ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यामुळे क्षणिक जाग येते आणि घशातील स्नायूंची शिथिलता जाऊन ते पूर्ववत होतात. श्वसन अवरोध नाहीसा झाल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो आणि पुन्हा झोप लागते. झोपेतील अडथळा क्षणिक असल्यामुळे पेशंटला त्याची जाणीव नसते. OSA असणाऱ्या व्यक्तीमध्ये हि झोपणे- जागे होणे आणि परत झोपणे हे चक्र पूर्ण रात्र सुरु राहते आणि त्यामुळे पुरेशी आणि समाधानकारक झोप होत नाही. अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यांना दिवसभर थकवा आणि सुस्तपणा जाणवतो, एकाग्रता कमी होते आणि दिवस जास्त प्रमाणात झोप येते( excessive daytime sleepiness).अशा वयक्तींमध्ये उच्च रक्तदाब व हृदयविकार होण्याची शक्यताही वाढते.
वरील लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी श्वसन अवरोध तर नाही ना हे sleep study द्वारे तपासून घेणे आवश्यक आहे. या तपासणीमध्ये झोपेदरम्यान वेगवेगळे निकष [ ह्रयद्याची गती, ECG,EEG( मेंदूची सजगता), शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण(SPO2), डोळ्याच्या हालचाली, स्नायूंची शिथिलता इ. ] रात्रभर मोजले जातात. त्यावरून OSA चे निदान होते आणि तिवरता ठरवण्यात येते. (mild/moderate /severe osa)
आहारावरील नियंत्रण आणि गरज पडल्यास औषधांच्या सहाय्याने वजन आटोक्यात आणणे हि OSA च्या उपचारातील महत्वाची पायरी आहे. नियमित व्यायामाचा समावेश दिनचर्येमध्ये केला पाहिजे. दररोज ३०-४० मिनिटे चालण्याचा व्यायाम हा सहज शक्य होऊ शकतो.
OSA तिव्रता जास्त असणाऱ्या पेशन्ट्सला डॉक्तरांच्या सल्ल्यानुसार झोपताना CPAP मशीन वापरण्याचा सल्ला दिला जातो . या उपचारपद्धतीमध्ये नाक आणि तोंडावर लावण्याच्या मास्कने मशीन जोडले जाते. झोपेदरम्यान मशीन अधिक दाबाने श्वास देण्याचे काम करते ज्यामुळे श्वसन मार्गामध्ये अडथळा येत नाही व सलग पुरेशी झोप मिळते.CPAP उपचारपद्धती बहुतांश रुग्णाना फायदेशीर ठरते. काही ठराविक पेशंटमध्ये शस्त्रक्रिया करून घशाच्या स्नायूंची रचना बदलली जाते.
“निद्रयात्तमं सुखं दुःखं पुष्टी: कार्श्यं बलाबलम्
वृषता क्लीबता ज्ञानमज्ञानं जीवितं न च “
चरक संहिता
आनंद वा दुःख, स्वास्थ्य वा रोग, शक्ती वा दुर्बलता, पुरुषत्व वा वंध्यत्व , ज्ञान वा अज्ञान आणि जीवन की मृत्यू या सर्व बाबी चांगल्या किंवा वाईट झोपेवर अवलंबून असतात.
चरक संहितेमधील हे सूत्र मानवी जीवनातील झोपेचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करते. शांत आणि समाधानकारक झोप हे सुदृढ मानसिक व शारीरिक आरोग्याचे द्योतक आहे. त्यामुळे झोपेसंबंधातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपाययोजना करणे हितकारक ठरते.
डॉ. श्वेता देशमुख
MBBS, DNB (Medicine), IDCCM
Consultant Physician
Deenanath Mangeshkar Hospital & Shashwat Hospital, Pune
Dr. Shweta Deshmukh
MBBS, DNB Medicine, IDCCM
Dr. Shweta Deshmukh is a Consultant Physician with experience in internal medicine and critical care. She is a Consultant Physician at Deenanath Mangeshkar Hospital and Shashwat Hospital in Pune, where she provides both outpatient (OPD) and inpatient (IPD) care.
Her clinical practice covers a wide range of adult medical conditions, including diabetes, hypertension, thyroid disorders, cholesterol and weight management, infections, respiratory illnesses, and digestive problems. She also provides preventive health consultations and follow-up care for patients recovering after hospitalization or critical illness.
Dr. Deshmukh believes in a careful and patient-centred approach to medical care. She focuses on understanding the patient's symptoms and medical history, performing a thorough clinical evaluation, recommending appropriate investigations when needed, and explaining the diagnosis and treatment clearly.
She established Dr. Shweta Deshmukh's Clinic in Karve Nagar, Pune, to provide accessible, comprehensive medical care for adults in the local community.
Call to book an appointment
Monday to Saturday 10:30–13:30.