Skip to content
Menu

मधुमेह

मधुमेह आणि पायांची काळजी: एक पाऊल निरोगी जीवनाकडे!

Dr Shweta Deshmukh in clinic
Dr. Shweta Deshmukh
प्रकाशित ६ ऑक्टोबर, २०२६
diabetic_foot_generated_image

मूळ प्रकाशन: मधुमित्र मासिक

“डॉक्टर , बाकी तब्येत चांगली आहे, पण गेल्या काही दिवसांपासून झालेली हि जखम बरीच होत नाही आहे. फारशी मोठी नाही आण त्याचा काही त्रासही होत नाही. कधीतरी अधूनमधून त्यातून पाणी येत रहाते. वरून मलम लावतो पण जखम वाढतेच आहे”. बऱ्याच वषापासून मधुमेह असणारे कुलकर्णी काका (नाव बदललेले आहे) त्यांचा त्रास सांगत होते. मधुमेहाचे पथ्य पाळताना गेले ६ महिने त्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले नव्हते आण तळव्याला झालेली जखम किरकोळ म्हणून दुर्लक्ष केले होते. पायाच्या जखमेचा जंतुसंसर्ग मधुमेहामुळे बराच वाढला होता.

मधुमेह हा शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करणारा आजार (multisystem disorder )आहे. मधुमेहाच्या रुग्णाला आहारातील पथ्ये, व्यायाम,वेळोवेळी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे, नियमित औषधे आण डॉक्टरांचा सल्ला यासाठी वेळ द्यावा लागतो. हे सर्व संभाळताना पायसारखा महत्वाचा अवयव मात्र दुर्लक्षित रहातो.

मधुमेहामुळे होणाऱ्या त्रासामध्ये पायांचे आजार हि गंभीर समस्या आहे. रक्तातील वाढलेली साखर आणि इन्सुलिन रेसिस्टन्स पायाच्या रक्तवाहन्यांची कार्यक्षमता कमी होते. काही मधुमेहींमध्ये पायाच्या नसांवर परिणाम झाल्यामुळे संवेदना कमी होणे,पायांची सतत आग होणे,जखमांची जाणीव न होणे यांसारखी लक्षणे दसून येतात. या जखमांमध्ये झालेला जंतुसंसर्ग झपाट्याने फैलावतो आण वेळीच इलाज न झाल्यास गॅंग्रीन होऊन ऑपेरेशन द्वारे तो भाग काढावा लागतो.
सोपे आण सहज पाळता येणाऱ्या नयमांनी हे सव टाळता येऊ शकते.

  • आपल्या पायांची दररोज तपासणी करा.
  • पायांवर येणारा लालपणा,सूज,जखमा,फोड,कुरूप(corn) कंवा घट्टे (callus) कडे वशेष लक्ष द्या. तळपायाच्या तपासणी साठी हातात धरता येण्याजोगा छोटा आरसा वापरावा.
  • पाय दररोज धुवून स्वच्छ ठेवावेत. पाय धुण्यासाठी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा.
    पाय धुतल्यानंतर ते मऊ सुती कपड्याने पाणी टपून कोरडे करावेत. पायांच्या बोटांमधली जागा कोरडी रहावी याची वशेष काळजी घ्यावी.
  • पाय मऊ रहावेत यासाठी मॉइस्चराइसेर चा वापर करावा. कोरड्या व रखरखीत पायांना खाज येऊन जखमा होण्याचा संभव असतो.
  • पायांच्या बोटांची नखे काळजीपूर्वक आणि नियमित कापावीत. नेलकटरने नखे कापल्यानंतर त्यांना हळुवार घासून बोथट करावीत. नखे खूप छोटी करू नयेत.
  • अनवाणी फरणे टाळावे. घरातही मऊ व जाड सोल असणाऱ्या स्लिपर्स वापरावे. आरामदायक आणि योग्य पादत्राणे निवडा . बोटे दुमडणारी किंवा पायाला घासणारी पादत्राणे वापरू नयेत.
  • पावलांच्या ठरावक भागांवर जास्त भार पडून होणाऱ्या जखमा टाळण्यासाठी customised पादत्राणांचा वापर करावा.
  • पायदुखी साठी डॉकटरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. गरम पाण्याने/तेलाने शेक घेणे कंवा heat pad सारखी उपकरणे मधुमेहींसाठी त्रासदायक ठरू शकते.
  • काही त्रास झाल्यास डॉकटरांकडून पायांची तपासणी करून घ्या. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी पायांच्या नसांची तपासणी (peripheral neuropathy check up) करून घ्यावे.
  • नियमित व्यायाम, संतुलत आहार आण योग्य औषधोपचाराने रक्तशकरा नयंत्रणात ठेवा.

पायाच्या अल्सर साठी काकांना प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स ) आण इन्सुलिन द्यावे लागले. काही दिवसांच्या हॉस्पिटल मधील उपचार आणि ड्रेसिंग नंतर त्यांची जखम पूर्णतः बरी झाली. आपले पायच आपल्याला स्वावलंबत्व देतात. त्यांच्या योग्य काळजीद्वारे आपण निरोगी जीवनाकडे वाटचाल करू शकतो.

डॉ. श्वेता देशमुख
MBBS, DNB (Medicine), IDCCM
Consultant Physician
Deenanath Mangeshkar Hospital & Shashwat Hospital, Pune

Dr Shweta Deshmukh in clinic

Dr. Shweta Deshmukh

MBBS, DNB Medicine, IDCCM

Dr. Shweta Deshmukh is a Consultant Physician with experience in internal medicine and critical care. She is a Consultant Physician at Deenanath Mangeshkar Hospital and Shashwat Hospital in Pune, where she provides both outpatient (OPD) and inpatient (IPD) care.

Her clinical practice covers a wide range of adult medical conditions, including diabetes, hypertension, thyroid disorders, cholesterol and weight management, infections, respiratory illnesses, and digestive problems. She also provides preventive health consultations and follow-up care for patients recovering after hospitalization or critical illness.

Dr. Deshmukh believes in a careful and patient-centred approach to medical care. She focuses on understanding the patient's symptoms and medical history, performing a thorough clinical evaluation, recommending appropriate investigations when needed, and explaining the diagnosis and treatment clearly.

She established Dr. Shweta Deshmukh's Clinic in Karve Nagar, Pune, to provide accessible, comprehensive medical care for adults in the local community.

संपूर्ण परिचय वाचा

Call to book an appointment

Monday to Saturday 10:30–13:30.

Call WhatsApp Directions